क्राईम 24 पर्दाफास न्युज*
ग्रामपंचायत डामरखेडा येथील 15 वा वित्तीय आयोगामधुन झालेले कामांची चौकशी करण्यात यावे याबाबत निवेदन सादर*….
आज दि 23/04/2025 रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने आणि राष्ट्रीय पक्ष वंचित बहुजन आघाडी चा वतीने मा .गट विकास अधिकारी सो पंचायत समिती शहादा यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की, ग्रामपंचायत डामरखेडा ता. शहादा येथील 15 वा वित्त आयोग योजनेत मागील पाच वर्षाच्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामांची चौकशी सविस्तरपणे करण्यात यावी. कारण की आमच्या असे निदर्शनास आलेले आहे की गावात सदर योजनेतुन कोणतेच काम न करण्यात आलेले आहे. फक्त कागदोपत्री व्यवहार दर्शवुन गावात कोणतेही काम करण्यात आलेले नाही. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी कागदपत्रे अहवाल कार्यालयास सादर करून योजनेचे पैसे हे बेकायदेशीर व्यवहार करून काढुन घेतलेले आहे. व गावाचा विकास न झाल्याने दोर्षीवर कडक कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे सहसचिव युवराज वाघवंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मण निकुम रविभाऊ मोरे तालुका उपाध्यक्ष आधी उपस्थित होते
