आज दिनांक 29/06/2025 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी शहादा शहर व तालुका यांची महत्वपूर्ण बैठक शहादा रेस्ट हाऊस येथे संपन्न झाली. येणाऱ्या शहादा महानगरपालिका निवडणुकीच्या तसेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने, तसेच शाखा उद्घाटन व संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे शहादा तालुकाध्यक्ष आदरणीय आबा निकम यांच्या अध्यक्षते खाली व नंदुरबार जिल्ह्याचे उप जिल्हाध्यक्ष रवींद्र भादू मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष नाना कुवर, प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या निरीक्षिक राणी ताई गावीत, सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रवक्ते संदीप रामराज्य, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा पानपाटील, जिल्हा संघटक शामराव पानपाटील (नंदुरबार) यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
शहादा तालुक्यातील विविध गावांतील प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये ज्ञानेश्वर दादा कोळी, संतोष दादा बैसाणे, छोटू दादा ठाकरे, मोहीन पठान, भावड्या दादा भिल, संजू दादा कोळी, महेंद्र गिरासे, दिपक दादा कोळी, सुरेश दादा भिल, सुकदेव भिल, सुभाष भिल, राजू दादा भिल, सजु नागजोगी, दगडु निकुंभे यांचा समावेश होता.
बैठकीमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला असून, स्थानिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा अधिक बुलंद करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
जय भीम! जय शिवराय जय आदिवासी जय वाल्मिकी जय लहुजी जय संविधान! | जय वंचित
