राष्ट्रीय पक्ष वंचित बहुजन युवा आघाडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार
लक्ष्मण निकुंभे तालुका अध्यक्ष शहादा, रवींद्र भादू मोरे उपजिल्हाध्यक्ष नंदुरबार, नाना कुंवर कार्याध्यक्ष नंदुरबार
“शहादा बस स्थानक – प्रशासन झोपलेलं, जनता पाण्यात! आता आंदोलन अटळ!”
– वंचित बहुजन युवा आघाडी, शहादा तालुका
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा हे राज्यातील एक प्रमुख उत्पन्न देणारे बस आगार असूनसुद्धा, आजच्या घडीला ते अक्षरशः जलतलावात रूपांतरित झाले आहे. प्रवाशांचे हाल, वृद्धांची अपमानास्पद चढउतार, महिलांची व मुलांची सुरक्षा धोक्यात – हे चित्र पाहूनही स्थानिक प्रशासन आणि आगार व्यवस्थापन शांत का आहे?
वंचित बहुजन युवा आघाडीला प्रश्न विचारायचा आहे – लाल परी चालवणारे अधिकारी अंध झालेत का? की मुद्दामहून दुर्लक्ष करत आहेत?
आगारात पावसाचे पाणी इतके भरले आहे की, बस कुठे लावावी हे चालकाला कळेनासं झालंय. वाहक व प्रवाशांमध्ये वादविवाद सुरू असून, डबक्यांतून चालणाऱ्या महिलांना, वृद्धांना व लहान बालकांना धोका पोहोचतोय. या प्रकारामुळे प्रवासी खाजगी वाहनांकडे वळू लागलेत – हा सार्वजनिक सेवकांचाच अपमान नाही का?
या परिस्थितीवर वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध आहे.
आमच्या ठाम मागण्या पुढीलप्रमाणे:
- शहादा बस स्थानकातील जलनिकासी व रस्त्यावरील पाण्याचा तात्काळ निचरा करण्यात यावा.
- आगार व्यवस्थापन व विभागीय अधिकाऱ्यांवर त्वरित चौकशी सुरू करून जबाबदारी निश्चित करावी.
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना हाती घ्याव्यात.
अन्यथा, वंचित बहुजन युवा आघाडी शहादा तालुक्यात तीव्र आंदोलन उभारेल. आम्ही रस्त्यावर उतरू, प्रशासनाला घेरू – आणि ती वेळ आली तर जबाबदारी पूर्णपणे शासनाची असेल.
हे सरकार ‘सबका साथ सबका विकास’ म्हणतं, पण वास्तवात शहाद्यातील जनतेला ‘सबका अपमान, सबका त्रास’ मिळतो आहे!
संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवनाचा अधिकार आहे – वंचित बहुजन आघाडी या हक्कासाठी संघर्ष करणारच!
लक्ष्मण शिवाजी निकुंभे राष्ट्रीय पक्ष
वंचित बहुजन युवा आघाडी ता अध्यक्ष, .रविद्र भादु मोरे राष्ट्रीय पक्ष वंचित बहुजन आघाडी उप जि अध्यक्ष नंदुरबार ,
नाना ( यादव ) कुंवर
कार्यअध्यक्ष नंदुरबार जिल्हा अध्यक्ष नंदुरबार, शहादा तालुका
उपसंपादक आनंद बच्छाव
कार्यकारी संपादक रवींद्र मोरे

