क्राईम २४ पर्दाफाश (लक्ष्मण निकुंभे – संपादक )
दि.१/-तालुक्यातील विना मान्यता असलेल्या अनधिकृतपणे चालू असलेली शाळेच्या संचालक मंडळावर कायदेशीर कार्यवाही होणे बाबत वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मागणी केली आहे.
शहादा तालुक्यातील आसलोद गावी एका खाजगी शाळा कडून स संबंधित शिक्षण विभागाकडून परवानगी न घेता सकाळी ७ वाजेपासून तर रात्री ९ वाजेपर्यंत क्लासेस शिकवणी वर्ग चालत असल्याची तक्रार वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे तालुका गट शिक्षणाधिकारी गट साधन केंद्र कार्यालय शहादा यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. आसलोद तेथे शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालू असून सदर शाळेच्या विद्यार्थ्यांवर परिणाम होत असल्याचे नमूद करून सदर प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे पत्रात नमूद केले आहे सदर गुरुकुल क्लासेस व वस्तीगृह खाजगीरित्या मान्यता नसतांनाही शिकवणी वर्ग जादा फी घेऊन अनधिकृत संबंधित संचालक मंडळाकडून मनमानीपणे चालवले जात असल्याचे पत्रात नमूद केले आहे.तसेच आरटीई कायदा २००९ चे कलम १८ प्रमाणे उल्लंघन करीत शाळा चालवित असल्याचे पत्रात म्हटले आहे. यापूर्वीही याबाबत परिसरातील पालकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या.मात्र संबंधित शिक्षण विभागाकडून काहीही दखल घेतली गेलेली नाही. जर याबाबत संबंधित अनधिकृत विना मान्यता असलेल्या क्लासेस व वस्तीगृह यांच्या संचालकांवर कायदेशीर कार्यवाही न झाल्यास आम्ही शहादा पंचायत समितीच्या प्रांगणात उपोषण किंवा आंदोलन उभे ठाकू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष आणि शहादा तालुका अध्यक्ष यांनी एका पत्रकाद्वारे दिला असून म. जिल्हाधिकारी नंदुरबार जिल्हा यांनाही पत्राची प्रत पाठवलेली आहे.
क्राईम 24 पर्दाफास संपादक लक्ष्मण निकुंभे
तालुक्यातील विना मान्यता असलेल्या अनधिकृतपणे चालू असलेली शाळेच्या संचालक मंडळावर कायदेशीर कार्यवाही होणे बाबत वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मागणी केली आहे.
