मोरदड येथील तरुणाच्या खुनातील मुख्य आरोपी वर वाढीव कलम लावून अटक करावी – वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा चाळीसगाव येथे मोर्चा
चाळीसगाव – मोरदड तालुका धुळे येथील मयत आदिवासी तरुण जगदीश ठाकरे याचा खून करणारा मुख्य सूत्रधार गोविंद शिवाजी पाटील या आरोपीवर भा.न्या.सं.IPC कलम 109 (ब) हे वाढीव कलम लावून जगदीश ठाकरे याला जिवे मारणाऱ्या इतर आरोपींसह मुख्य सूत्रधारास त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी एकलव्य आघाडी व वंचित
बहुजन आघाडीच्या वतीने दि 12/8/25 रोजी चाळीसगाव येथे भव्य मोर्चा काढून मागणीचे निवेदन DYSP विजकुमार ठाकुरवाड यांना देण्यात आले. या मोर्चात महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवेदनात म्हटले आहे की 29 जून 2025 रोजी आदिवासी तरुण जगदीश ठाकरे याची राजकीय षडयंत्रातून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. दिड महिना उलटून गेला तरी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी गोविंद शिवाजी पाटील हा बिनधास्तपणे बाहेर फिरत असून धुळे तालुक्यातील आमदार तसेच मालेगावचे मंत्री दादा भुसे यांचा हा आरोपी जवळचा नातेवाईक आहे. त्यामुळे मयत जगदीश ठाकरे याचे वडील व पत्नी व इतर जवळचे नातेवाईक पोलिसांना या षडयंत्रमागे फक्त गोविंद शिवाजी पाटील याचाच हात आहे म्हणून त्याला अटक करावी अशी मागणे ते पोलिसांना करत मयत ठाकरे यांची पत्नी फिर्याद देताना गोविंद पाटलांचं नाव घेत होती परंतु पोलिसांनी ते फिर्यादीमध्ये घेतलं नाही. या गुन्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती कलमांन अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत परंतु पोलिसांनी अजून मयत जगदीश ठाकरे यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे पुरवणी जबाब घेतलेले नाही. याचाच अर्थ पोलिसांवर राजकीय दबाव तसेच काही पैशांचा व्यवहार देखील झाल्याची माहिती आहे असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस संबंधित मुख्य आरोपीस अटक करत नाहीत. अशी पंचक्रोशीत चर्चा आहे.
राज्याचे आदिवासी मंत्री हे हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्ह्यामध्ये राहतात. आदिवासी तरुणाची अतिशय निर्घुण हत्या करण्यात आली आहे. तरी देखील एक वाक्य आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी या प्रकरणासंदर्भात काढले नाही.खरे पाहता या कुटुंबाला डॉक्टर अशोक उईके यांनी सांत्वन पर भेट देऊन या कुटुंबाला शासनाकडून भरीव मदत देऊन या कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीला लावण्याची शिफारस करणे गरजेचे होते, परंतु आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांचा आरोपी हा जवळचा नातेवाईक आहे. या कारणामुळे या प्रकरणात या आदिवासी कुटुंबाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे आदिवासी तरुणाला न्याय न देण्याची त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी या संविधानिक आदिवासी मंत्री पदाचा अपमान केला आहे व आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी च्या “जवाब दो मोर्चात”
आदिवासी तरुण जगदीश ठाकरे याची निर्घुण हत्या प्रकरणी आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्यात कसूर कसूर केला आहे म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या आदिवासी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा,
जगदीश ठाकरे खून प्रकरणात मुख्य सूत्रधार आरोपी गोविंद शिवाजी पाटील हा, स्थानिक आमदार व मंत्र्याचा नातेवाईक असल्याकारणाने पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आहे. त्यामुळे हा तपास सीआयडी कडे वर्ग करावा,
जगदीश ठाकरे यांची हत्या घडवून आणणारा मुख्य सूत्रधार आरोपीवर भा.न्या. सं. 2023,IPC कलम 109(ब) हे वाढीव दाखल करून त्याला त्वरित अटक करावी,
जगदीश ठाकरे हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता पुरुष असल्याकारणाने सरकारने त्याला 1 कोटीची आर्थिक मदत करून त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी,
पिंपरखेड तांडा तालुका चाळीसगाव या ठिकाणी आदिवासी समाजाची सुमारे 39 कुटुंबे नदी क्षेत्रामध्ये राहतात.या कुटुंबांचे पुनर्वसन त्वरित करावे या मागण्या करण्यात आल्या आहेत
या मोर्चातील मागण्या संदर्भात राज्य सरकारने व प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथा एकलव्य आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर या विषयाला धरून तीव्र आंदोलन पुढील काळात छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
मोर्चाचे नेतृत्व अनिलराव जाधव =प्रदेशाध्यक्ष एकलव्य आघाडी महाराष्ट्र राज्य,व वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात प्रा.किसनजी चव्हाण सर प्रदेश उपाध्यक्ष VBA,अँड.अरुण आबा जाधव प्रदेश प्रवक्ता VBA, धुळे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात VBA, किरण भाऊ मगरे.प्रदेश कार्याध्यक्ष एकलव्य आघाडी, चाळीसगाव शहराध्यक्ष सागर निकम यांनी केले यावेळी चाळीसगाव शहरातील तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता,आणि मोरदड,गाव मयत जगदीश ठाकुरे यांची पत्नी आणि जगदीश ठाकरे यांच्या वडील, व सागर बागुल, तसेच मोरदड येथील सर्व कार्यकर्ते व आदिवासी बांधव व महिला सहभागी झाले होते.
प्रत माहितीसाठी
1) माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य.
2)माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब,- राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी.
3) माननीय आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके महाराराज्य राज्य.
4) माननीय एससी, एसटी आयोग मुंबई.
5) माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव
6) माननीय पोलीस अध्यक्ष साहेब जळगाव.
7) माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी साहेब चाळीसगाव.
