गोगापूर परिसरात वादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी व ग्रामस्थांचे नुकसान

0Shares

तारीख : 27 मे 2025

गोगापूर परिसरात वादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी व ग्रामस्थांचे नुकसान

गोगापूर ता. शहादा _, जि. नंदुरबार येथे दिनांक 26 मे 2025 रोजी संध्याकाळी सुमारे सहा वाजता अचानक आलेल्या जोरदार वादळ, वाऱ्याचा वेग व मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचे नुकसान, झाडे उन्मळून पडणे, घरांचे पत्रे उडणे तसेच काही घरांचे आंशिक/पूर्णतः नुकसान झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य तो आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी ग्रामस्थ व शेतकरी वर्गाची मागणी आहे.तरी संबंधित यंत्रणांनी त्वरीत दखल घेऊन मदत कार्य सुरू करावे, अशी सर्व गावकऱ्यांची नम्र विनंती आहे.—संपर्कासाठी क्राईम 24 पर्दाफाश न्यूज मुख्य संपादकलक्ष्मण शिवाजी निकुंभे 9022613721

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *