परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान.

0Shares

*परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान*..*कोरीट येथील आठ एकर कापसाच्या शेतात पाणीच पाणी*…*दिवसभर मोटर पंप लावून पाण्याचा उपसा,शेतकरी चिंतेत*…मुख्य संपादक लक्ष्मण निकम:-नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून परतीचा मुसळधार पाऊस सुरू आहे… यामुळे अनेक पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.. अशातच कोरीड येथील शांतीलाल पाटील या शेतकऱ्याच्या आठ एकर कापूस पिकात पावसाचे पाणी तसेच नाल्याचे देखील पाणी शिरल्याने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे… दिवसभर डिझेल पंप लावून पाण्याचा उपसा केल्यानंतर देखील शेतातील पाणी जैसे थे परिस्थितीमध्ये असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र समोर आले आहे…त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याकडून होत आहे…बाईट :-शांतीलाल पाटील नुकसानग्रस्त शेतकरी, कोरीट, जिल्हा नंदुरबार

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *